पत्नीची अश्‍लील चित्रफीत बनवत व्हायरल करण्याची धमकी : पतीसह पाच संशयीतां विरोधात गुन्हा ;


पाडळसरे :
माहेरून दहा लाख रुपये न आणल्याने तसेच पतीनेच मोबाईलमध्ये तयार केलेली अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
6ममुराबाद येथील मूळ रहिवासी व पनवेलमधील कळंबोली येथील प्रकाश शिंदे यांचा मुलगा संतोष याच्याशी हिंगोणे खुर्द येथील तरुणीचा विवाह झाला होता. पीडित विवाहितेशी काही दिवस सर्व जण चांगले वागले मात्र त्यानंतर त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. दहा लाखांसाठी पती मानसिक व शारीरिक छळ करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत तयार करत होता. दरम्यान, या विवाहितेने नातेवाइकांच्या मदतीने समेट घडवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीने व सासरच्यांनी प्रतिसाद दिला नाही.
या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पती संतोष प्रकाश शिंदे, सासू किरणावती शिंदे, नणंद सुरेखा कमलाकर पाटील व लहान नणंद उर्मिला निवृत्ती पाटील व नंदोई निवृत्ती पाटील (रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.