वरणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरणगाव शहरात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणात पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी संकलन मोहिम जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वात राबवण्यात आली. 21 हजारांचा मदत निधी जमल्यानंतर तो राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, प्रदेश कार्यालय, मुंबईला सुपूर्द करण्यात आला.

संकटात आपण सर्वांनी तेथील स्थानिकांना मदत नाही तर कर्तव्य समजून सर्वांनी शक्य असेल तितकी यथाशक्ती मदत द्यावी आणि या कार्यात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी वरणगावकरांना केल्यानंतर मदतीसाठी अनेक हात सरसावले.
मदत निधी संकलन करतांना प्रसंगी भुसावळ तालुका उपाध्यक्ष प्रकाश वसंत नारखेडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, माजी नगरसेवक विष्णू खोले, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, माजी नगरसेवक रवी सोनवणे, माजी नगरसेवक बबलू माळी, कैलास माळी, अनिल चौधरी, इफ्तेखार मिर्झा, रवी पाटील, युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी, महेश सोनवणे, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे, ओबीसी सेल तालुका कार्याध्यक्ष मिलिंद महाजन,ओबीसी सेल तालुका चिटणीस प्रश्नांत बोंडे, ओबीसी सेल शहराध्यक्ष हिमालय भंगाळे, शांताराम सुरळकर, जितू मराठे, आकाश झोपे, कैलास भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते


