भुसावळात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचा रुट मार्च –

भुसावळात रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचा रुट मार्च –
भुसावळ –
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथून आलेल्या शस्त्रधारी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांनी मंगळवार रोजी शहरातील विविध भागातून पथसंचलन (रूट मार्च) केले या पथसंचलनामुळे जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे रूट मार्चमध्ये सहभागी झाले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रजा टॉवर, पापा नगर, शनी मंदिर वॉर्ड, मुख्य आठवडे बाजार, जामनेर रोड, भारत नगर, गवळी वाडा, जळगाव रोडमार्गे शहर पोलीस ठाण्यापर्यंत रूट मार्च काढण्यात आला.