इनरव्हील क्लबतर्फे साक्षरता अभियान – क्लबचा कौतुकास्पद उपक्रम ;

भुसावळ – इनरव्हील क्लब ऑफ भुसावल तर्फे साक्षरता अभियानास सुरवात करण्यात आली असुन कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू अशिक्षित महिलांना शिकण्याकरीता शिक्षण साहित्य देऊन शिक्षणाचे ज्ञान देण्यात येत आहे.
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ तर्फे सर्व साक्षरता अभियान अंतर्गत प्रौढ साक्षरता उपक्रम सर्व पदाधिकारी व सदस्यांकडून राबविण्यात येणार आहे. महिलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून इनरव्हील सख्यांनी गरजू अशिक्षित महिलांना शिक्षित व साक्षर करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना करून सुरूवात केली आहे. प्रसंगी या महिलांना पाटी , पेन्सिल,वही व पेन देण्यात आले .

शिक्षण ही एक सामाजिक जबाबदारी आहे. या बांधिलकीची जाणीव जपत हा उपक्रम प्रत्येक सदस्य आपआपल्या घरी वर्षभर राबविणार आहेत .इनरव्हील क्लब प्रेसिडेंट वंदिता पारे ,सेक्रेटरी अलका भटकर, सविता शुक्ला, किरण शुक्ला रुचिका शर्मा,आशा पाटील वृषाली पाटील आदी सदस्यांनी याउपक्रमास सुरुवात केली आहे.