भुसावळ शिक्षक सेनेतर्फे भुसावळ व अडावद येथे वृक्षारोपन ;


भुसावळ –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त भुसावळात शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले .

२६ जुलै रोजी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिक्षक सेनेतर्फे
हेमंत चौधरी सर उपाध्यक्ष , राज्य शिक्षकसेना नाशिक विभाग यांचे हस्ते अडावद ता.चोपडा, व भुसावळ येथील तुकाराम नगर,नाहटा कॉलेज समोर, शिव कॉलनी ,विद्यानगर, दत्त नगर येथे मुख्याध्यापक एच.डी.धांडे सर, पर्यवेक्षक प्रमोद शुक्ला सर,शिक्षकसेनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षा- सौ.हेमलता चौधरी, जिल्हाध्यक्ष- विनोद गायकवाड, घनश्याम निळे-जिल्हा संघटक, भुषण नगरे -संपर्क प्रमुख, बाळू गायकवाड -जिल्हा सचिव, सौ.पुष्पां वंजारी-जिल्हा सरचिटणीस, व शिक्षक,शिक्षिका या सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.