यावल –
यावल, हरिपूर, मोहराले येथे शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिक्षक सेनेतर्फे प्रेरणा पंधरवाडयाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले,

यावेळी शिक्षकसेना महाराष्ट्र अध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अजित चव्हाण यांच्या मार्गदर्शना नुसार महाराष्ट्र राज्य प्रादेशिक सचिव सुधिर तायडे , विभागीय उपाध्यक्ष हेमंत चौधरी यांच्या नेतृत्वात हरिपूरा, यावल मोहरले येथे प्रेरणा पंधरवाडा निमित्त मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी रावेर लोकसभा जळगांव जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड सरचिटणीस डॉ, नरेंद्र महाले, संघटक घन:श्याम निळे , सचिव बाळू गायकवाड, यावल तालुका अध्यक्ष रियाज शेख , रऊफ सर, रफिक सर आणि शिक्षक सेना सदस्य व विद्यार्थी मित्र परिवार उपस्थित होते .
प्रसंगी यावल तालुका अध्यक्ष शेख रियाज सर यांची मुलगी फिलजा शेख हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त यावल येथील दांगपुरा , बाबानगर, येथे सुध्दा मोठ्या उत्साहात वृक्षारोपण
करण्यात आले.


