भुसावळ –
तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने हिरवेगार स्मार्ट विलेज निर्मितीचा संकल्प केलेला असून वृक्षारोपणासाठी शिस्तबद्धपणे खड्डे खोदण्याचे कामास ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवात केलेली आहे
ग्रामपंचायत प्रशासन दरवर्षाला 100 झाडे लावते जगण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करतेस पैकी बरेच झाडे जगलेली असून यावर्षी राजमाता जिजामाता उद्यान व मंगल कार्यालय या ठिकाणी 200 झाडे लावण्याचा उपक्रम ग्रामपंचायत प्रशासनाने आखलेला आहे त्यापैकी 50 टक्के फळझाडे लावण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे त्यासाठी नियोजन बद्ध लाईन आखून ७ फुट अंतरावर एक झाड असे नियोजन केलेले असून त्यासाठी वेळोवेळी पाणी टाकता यावे यासाठी जेसीबी च्या माध्यमातून रस्ते व खड्डे खोदकाम करण्याचे कामास सुरुवात करण्यात आलेली आहे खड्डे काम पूर्ण झाल्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या ट्री गार्ड सहित त्यासाठी लागणारी माती व खते असे व्यवस्थापन पूर्ण झाल्यानंतर वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात येईल व ते जगविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने दत्तक आराखडा असलेला असून प्रत्येक झाडाला एक नाव देण्यात येणार आहे व ते जोपासण्याची जबाबदारी त्या परिवारावर देण्यात येईल असा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे
भविष्यात साकेगाव हिरवेगार व फळांचे गाव म्हणून संबोधावे यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे कोणत्या पद्धतीचे नियोजन कथा आयोजन करण्यात आलेले आहे गड्डे खोदकाम प्रसंगी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे सरपंचपती विष्णू सोनवणे अनिल सोनवाल रवींद्र त्र्यंबक पाटील गोपाळ पाटील प्रदीप कोळी पंकज ठाकूर पप्पू पटेल आदींची उपस्थिती होती



