भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे संस्थापक ना.बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ जुलै हा “समाजहित- समाजभान ” सप्ताह साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या दिवशी अवाढव्य खर्च टाळुन गरजुंना अत्यावश्यक सुविधांचा लाभ व्हावा, कोविड १९ चे महामारीत गरिब जनता वेगवेळ्या संकटांना तोंड देत आहे, या शिबीराचे माध्यमातुन त्यांची थोडी सेवा घडेल या अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अन्नदानाचा उपक्रम राबविन्यात आल्याचे जळगाव जिल्हा आघाडी प्रमुख सौ.राजश्री उमेश नेवे यांनी व्यक्त केले,
दरम्यान सप्ताहांत समाजहित जोपासण्याकरिता विकासदादा घुगे ,कृष्णांत दादा गायकवाड , कृष्णादादा बोदेले ,
यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ राजश्री नेवे यांच्या सौजन्याने
जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहे . 5 जुलै रोजी नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त भुसावळ येथिल एकलव्य भिल्ल वस्ती मध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला,
प्रसंगी सुमारे ६०-७० परिवारांना खिचडी चे वाटप करण्यात आले, महागडे केक, फुलगुच्छ, मोठमोठी अवाढव्य बॅनर असे खर्च न करता गरजवंतांची गरज ओळखून व भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास घालुन साजरा करा असा संदेश बच्चुभाऊंनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिला आहे, व त्यांचे आदेशाचे पुरेपुर पालन करीत अन्नदान केल्याचे जिल्हा आघाडी प्रमुख सौ.राजश्री नेवे यांनी सांगितले .
यावेळी सौ माया चौधरी,सौ वंदना झांबरे,सौ स्मिता माहुरकर,सौ निलेश फंड, सौ रोहित महाले,सौ दुर्गेश झोपे हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,
सखी श्रावणी महिला संस्था, गोसेवा परिवार समिती रोहित महाले , मनीष लाखोरे ,सागर मुरलिया ,श्रद्धा परदेशी,कोमल परदेशी ,आकाश मुरलिया ,आदित्य सरकाटे, उमेश नेवे यांचे सहकार्य लाभले,



