भुसावळचे डॉ.नितीन पाटील यांचा मुंबईत ‘देवदूत’ पुरस्काराने सन्मान –

मुंबई :

कोरोनाच्या कठीण काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत भुसावळातील श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट , ट्रामा आणि डायलिसिस सेंटरचे डॉ.नितीन पाटील यांना ‘देवदूत’ पुरस्काराने मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवार, 4 जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, दैनिक पुढारीचे मुंबईचे कार्यकारी संपादक, लोकमत 18 चे संपादक आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ.नितीन पाटील यांना मिळालेल्या पुरस्कारानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *