माजी आमदार संतोष चौधरींना अटकेपासून दिलासा – भुसावळ सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला : अर्नेषकुमार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे दिले आदेश –

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना अटकेपासून दिलासा –
भुसावळ सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला : अर्नेषकुमार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे दिले आदेश –
भुसावळ –
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.संजय भन्साली यांनी गुरुवार, 1 जुलै रोजी जामीन फेटाळला मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश देण्यात आल्याने चौधरींना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून सत्र न्यायालयात आतापर्यंत 22 व 24 तसेच 30 जून रोजी जामिनावर युक्तीवाद करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 1जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे सांगितल्याने निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.
भुसावळातील सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे सोमवार, 14 रोजी अधिकार्‍यांसह गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी तेथे आल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
संतोष चौधरी यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर 22 पर्यंत त्यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 22 व 24 व 30 जून रोजी दोन्ही पक्षांकडून विविध मुद्यांवर युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर 1 जुलै रोजी अंतीम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे सांगितल्याने शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष लागले होते. गुरुवार, 1 जुलै रोजी न्या.संजय भन्साली यांनी चौधरी यांचा जामीन फेटाळला मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार 2014 खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश दिल्याने तूर्त चौधरी यांना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयात माजी आमदार चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे, अ‍ॅड.मनीष सेवलानी तर सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी काम पाहिले. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *