जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येतोय ; आज ७७ नवे रुग्ण आढळले

जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. एप्रिल व मे महिन्यातील लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी नवे रुग्ण शंभरच्या आत आहे. आज शनिवारी दिवसभरात ७७ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १८७रुग्ण बरे झाले. एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.

आजच्या नव्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १ लाख ४१ हजार ४४६ वर गेला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३६ हजार ८७१ वर पोचला आहे. एका मृत्यूसह बळींचा आकडा २५६१ झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव ग्रामीण १२, जळगाव ग्रामीण ०४, भुसावळ ०५, अमळनेर, ०३, चोपडा-०६, पाचोरा-०४, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल-०४, एरंडोल-०२, जामनेर-०५, रावेर-०५, पारोळा-०३, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-०४, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ७७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *