राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कुलची विद्यार्थिनी काजल मलखान सिंह राज्यात दुसरी ;


भुसावळ –
दि 22 मे रोजी “आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस” साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळामार्फत राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत भुसावळ येथिल बियाणी मिलिटरी स्कूलची विद्यार्थिनी काजल मलखान सिंह हिने राज्यस्तरावर 3000 स्पर्धकां मधून द्वितीय क्रमांक पटकावला.
तिच्या यशाबद्दल तीचे संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी,उपाध्यक्ष विनोद बियाणी,सचिव डॉ.संगीता बियाणी,संचालक रौनक बियाणी,प्राचार्य डी एम पाटील,कला शिक्षक जे आर सोनार तसेच शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी काजलचे पालक मलखान सिंह व आई उर्मिला सिंह उपस्थित होते. काजलला स्पर्धेसाठी शाळेचे कलाशिक्षक जे आर सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *