भुसावळ (प्रतिनिधी ) –
जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने वेल्हाळे, पिंप्रीसेकंम परिसरात ५००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून जागतिक पर्यावरण दिवशी संयुक्त प्रदूषण निर्मूलन समिती, संघर्ष समिती व शिवसेना भुसावळतर्फे वेल्हाळे येथे राखेच्या बंडाजवळ ५५ वृक्षांचे वृक्षारोपण केले. वृक्षारोपण प्रसंगी मुक्ताईनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. बच्छाव, सामाजिक वनीकरण वनपरीक्षेत्र अधिकारी ए. पी.पंडित, वनपाल एल.डी. गवळी, वनपाल व्ही.एन. पवार, वनरक्षक एम.जी.बोरसे, माजी आमदार दिलीप भोळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, संघर्ष समिती अध्यक्ष रमाकांत चौधरी, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, उपसरपंच राजेंद्र सुरवाडे, विजय पाटील, प्रमोद पाटील, भरत सरोदे, सुभान गवळी उपस्थित होते.
मुख्य अभियंता वृक्षारोपणाला गैरहजर:
दिपनगर केंद्राची राख मोठ्याप्रमाणात या भागात सोडली जाते. त्यामुळे जल, वायू आणि इतर प्रदुषण या भागात वाढत आहे. तसेच या भागातील नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे आयोजक संतोष सोनवणे यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्धार केलेला आहे. त्याअनुषंगाने दिपनगर केंद्राचे मुख्यअभियंता व उपमुख्यभियंता यांना वृक्षारोपणासाठी आमंत्रित केले होते. सामाजिक दायित्व म्हणून कार्यक्रमात सहभाग नोंदवणे गरजेचे असतांना त्यांनी कार्यक्रमाला दुर्लक्ष केले. याची तक्रार प्रदूषण मंत्री आदित्य ठाकरे यांना केलेली असून लवकरच ते याबाबतीत कारवाई करणार आहे असे आयोजकांनी कळविले आहे.
१३ जून पासून तालुक्यात भरगच्च वृक्षारोपण
प्रदूषण निर्मूलन अभियानांतर्गत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसापासून भुसावळ तालुक्यातील गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. तालुक्यातील ग्रामसेवकांनी संपर्क साधण्याचे आवाहन संतोष सोनवणे यांनी केले आहे .
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, शहरप्रमुख निलेश महाजन व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




