भुसावळ (प्रतिनिधी ) –
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शन व आदर्श डोळ्यासमोर ठेवून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ध्येय धोरणानुसार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा 55 वा वाढदिवस 55 विविध सामाजिक उपक्रम राबवीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
भुसावळातील शिवसैनिक तथा शिवभोजनचे संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांचे तर्फे नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते .यामध्ये गरीब,गरजू व निराधार नागरिकांना अन्नदान वाटप, पालिका रुग्णालयात गरीब रुग्णांना औषधे ,यासह गरोदर माता यांना लागणारे इंजेक्शन दवाखान्यात दिले तसेच कोरोनामुळे एखाद्या परिवारात मृत्यू झाला आहे त्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली. तसेच गरीब व गरजू महिला जिच्या घरावर पत्रे नाही अशा महिलांना व गरीब अपंग महिलांना आर्थिक मदत देण्यात आली . दि.5 जून जागतिक पर्यावरण दिवस असल्यामुळे 55 वृक्षाचे रोपण करण्यात आले तर पोलिस कर्मचारी , होमगार्ड यांना सॅनिटायझर व मास्क देण्यात आले. बाजारात भाजीपाला विक्रेत्यासह नागरीकांना मास्क देण्यात येवून ना गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विविध 55 सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला .
आयोजित कार्यक्रमास माजी जिल्हाप्रमुख जगदीश कापडे , जिल्हाप्रमुख समाधान महाजन , विलास मुळे , एडव्होकेट कैलास लोखंडे , प स समिती सदस्य विजय सुरवाडे , उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, शहर प्रमुख निलेश महाजन, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, हेमंत ब-हाटे, मिलिंद कापडे, धीरज वर्रढोंनकर , मनोज ठाकूर यांचेसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



