राष्ट्र घडवणाऱ्या शिक्षकांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य संघटनेने केले पाहिजे -विजय कुमार सिंह ;शिक्षक हा राष्ट्र घडविणारा महत्त्वाचा घटक ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
शैक्षणिक क्षेत्रातील आपली जबाबदारी पार पाडून सामाजिक बांधिलकी या नात्याने प्रत्येक कार्य आत्मियतेने करणाऱ्या शिक्षकांचा गौरव समाजाने केला पाहिजे. शिक्षकांच्या योगदानाची दखल समाजाने घेतली पाहिजे यासाठी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे कार्य समाजासमोर आले पाहिजे. असे प्रतिपादन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय प्रमुख विजय कुमार सिंह यांनी केले.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या मीडिया सेलची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताध्यक्ष कांता तुंगार उपस्थित होते सदर ऑनलाईन बैठकीमध्ये प्रसिद्धी माध्यमाचे नियोजन कसे करावे, शिक्षक महासंघाचे यूट्यूब चैनल निर्मिती, शिक्षक महासंघाचे फेसबुक पेज निर्मिती, दिनांक 17 व 18 जून रोजी होणारी राष्ट्रीय मिडिया कार्यशाळा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रारंभी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृष्णा हिरेमठ यांनी आपल्या प्रास्ताविकात मीडिया सेलच्या बैठकीबाबत सविस्तर माहिती सांगितली.मीडिया सेलचे राष्ट्रीय पश्चिम विभाग प्रमुख डॉ. सुभाष आठवले यांनी शिक्षकांच्या संघटनेचे मीडिया सेल हे सक्षम व सक्रिय असणे गरजेचे असल्याचे सांगितले.राष्ट्र के हित मे शिक्षा, शिक्षा के हित मे शिक्षक और शिक्षक के हित में समाज या त्रिसूत्रीवर कार्य करणारी आपली संघटना आहे . हक्का बरोबरच कर्तव्याची जाण असणारी संघटना आहे, संघटनेचे विचार , कार्य आणि संघटनेने आजपर्यंत मिळवलेले यश हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून शिक्षकांसमोर व समाजासमोर आले पाहिजे. संघटनेच्या विस्तारासाठी मीडिया सेलचे महत्व अनन्य साधारण असल्याचेही डॉ. सुभाष आठवले यांनी सांगितले .
राष्ट्रीय सह प्रभारी बसंत जिंदाल यांनी प्रसिद्धी माध्यमातील सूक्ष्म नियोजन सांगितले
याप्रसंगी शिक्षक महासंघाचे कोल्हापूर विभाग प्रमुख राजेंद्र कोरे यांनी महासंघाच्या युट्युब चॅनलची निर्मिती करण्याची जबाबदारी घेतली असल्याचे सांगितले.
शिक्षक महासंघाचे मुख्य सचिव प्रकाश देशपांडे यांचेही याप्रसंगी मार्गदर्शन झाले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तुंगार यांनी आजच्या काळात संघटनेचे प्रसिद्धी विभाग सक्षम असणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी त्यांनी नुकत्याच एका साप्ताहिकात शिक्षकांची बदनामी करणाऱ्या संपादकिय लेखाचा उल्लेख केला, आपल्या महासंघाचे प्रसिद्धी विभाग सक्षम आणि सक्रीय असल्यास अशा विघटन व विकृत प्रवृत्तीला आपण आपल्या लेखणीतून प्रतिउत्तर देऊ शकतो असे तुंगार म्हणाले. या बैठकीस नंदकुमार हंबर्डे,सुरेंद्र तिके,विश्वजीत माणिकशेट्टी, रसिका परब ,जीवन महाजन, रमेश शिंगाडे उपस्थित होते.आभार विश्वजित माणिकशेट्टी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *