लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष आता आठवड्यातून चार दिवस ;

लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष आता आठवड्यातून चार दिवस
प्रतिनिधी –
मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 02101/02102 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेषची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्संचयित तपशील खाली दिलेल्यानुसार:

ट्रेन क्रमांक 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष दि. ४.६.२०२१ ते २९.६.२०२१ पर्यंत सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल.

ट्रेन क्रमांक 02102 हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ६.६.२०२१ ते १.७.२०२१ पर्यंत सोमवार, बुधवार, गुरूवार आणि रविवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल.

आरक्षण : पूर्णतः आरक्षित 02101 या विशेष ट्रेनच्या पुनर्संचयित फे-यांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू करण्यात आलेले आहे.

तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

प्रवाशांना विनंती आहे की कृपया याची नोंद घ्यावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *