भुसावळ शहराला सांस्कृतिक चेहरा देणारा माणूस आज चिरनिद्रेत ….


जागर गौरव पुरस्काराने सन्मानित मांडाळकर सर कालवश ….
भुसावळ शहराची ओळख मांडाळकर सरांनी सांस्कृतिक चेहरा म्हणून पुढे उभे केली. अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांना आपल्या शब्दांच पाठबळ दिलं. सेवानिवृत्त झाले असले आणि वयना वृद्ध असले तरी, मनानं चिरतरुण असणार हे व्यक्तिमत्त्व होतं. कुठल्याही कामात हिरीरीने सहभाग त्यांचा असायचाच चांगलं व्हावं म्हणून ‘चांगलं तिथं आम्ही’ असे मांडाळकर सर होते
ज्येष्ठ नागरिक संघाची तर मांडाळकर सरांनी एक मोठी चळवळ उभी केली. घरात बसून कंटाळवाणं वाटणार जीवन ज्येष्ठांच्या मनात नवतरुन्याची ज्योत निर्माण करून गेलं. 2017 मध्ये 15 ऑक्टोबर रोजी जागर प्रतिष्ठान च्या वर्धापन दिनानिमित्त व वाचन प्रेरणा दिनानिमित्त जागर गौरव पुरस्कार देऊन सरांना कुटुंबासह गौरविण्यात आले होते. तो क्षण आजही आम्हा सर्वांना आठवतो. सरांनी पुरस्काराचे ओझ कधी बाळगलं नाही. काम हेच पुरस्कार म्हणून स्वीकारला आणि सतत क्रियाशील राहिले. जाणत्या, अजाणत्यांना, अबालवृद्धांना यथाशक्ती मदत केली.
सामाजिक संस्थांची कामं लोकसहभागातून उभी राहत असतात हे सरांना अत्यंत चांगलं माहीत होतं. म्हणून जातील तिथं फूल नव्हे फुलाची पाकळी प्रेरणा म्हणून द्यायचे.
रोटरी क्लब साठी एक नवी दिशा त्यांनी निर्माण केली. रोटरी क्लबच्या माध्यमातून भरीव काम सरांनी भुसावळ शहरात उभे केले.
सरांच्या वक्तृत्वाची एक विशेष शैली होती सर्वांना भावणारी, सर्वांना सेवार्थ लढवणारी..
सर संपूर्ण भुसावळ शहरावर आपण आणि आपल्यावर संपूर्ण भुसावळ अविरत प्रेम करत आलाय तुमच्या पश्चात तुमचा आशीर्वाद सदोतीत आमच्यावरती असू द्या !

भावपूर्ण श्रद्धांजली ..
प्रा.पंकज पाटील
जागर प्रतिष्ठान भुसावळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *