महाप्रबंधकां सोबत भुसावळ रेल कामगार सेनेची चर्चा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेचे महाप्रबंधक आलोक कंसल हे भुसावळ येथे दौऱ्यावर आले असता रेल कामगार सेना भुसावळ शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवुन सत्कार केला तसेच सोशल डिस्टन पाळत चर्चा केली ,प्रसंगी कामगारांच्या विविध ज्वलन्त मुद्य्यावर चर्चा करण्यात आली. महाप्रबंधक आलोक कंसल यांनी बहुसंख्य मुद्य्यावर सहमति दर्शवून लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
भुसावळ विभागात कोरोना महामारी च्या काळात रेल्वे प्रशासनाने फार चांगल्या प्रमाणात कार्य केले व कोरोना पॉझिटिव्ह कामगाराना विशेष प्रकारे धीर देवून मनोबल वाढवले असे रेल कामगार सेनेतर्फे महाप्रबंधकांना सांगीतले, कोरोना काळात चांगले कार्य केल्याबद्दल रेल कामगार सेनेचे महाप्रबंधकांनी कौतुक केले.
या वेळी डीआरएम विवेक कुमार गुप्ता,सिनीयर डीपीओ एन डी गांगुर्डे,स्टेशन मॅनेजर जी आर अय्यर,रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा,राजेश लखोटे,प्रितम टाक,विनोद वाघे,योगेश माळी,प्रदीप भुसारे,महेंद्र सोनवणे,अब्दुल अजीज,गोपाल पाटिल,पंकज ठाकरें,कमलाकर बानाईत,विजय तायड़े,अरविंद थोरात,एम के शाहा,प्रकाश करसाळे,अनंत खेड़कर,राकेश पाठक सह रेल कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *