भुसावळातील अमरदीप लॉज मध्ये जुगार अड्ड्यावर धाड ; आठ जणांवर गुन्हे दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉज येथे काही इसम जुगार खेळ खेळत असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक यांना मिळाल्यावरून सदर ठिकाणी गुन्हे शोध पथक जाऊन छापा कारवाई करून आठ जणांना १,२५,२७० रुपये
मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉजमधील रूम नंबर २०१ मध्ये दिनांक १/६/२०२१ रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जावेद खान आकिब खान वय ३७ राहणार खडका रोड उस्मानिया कॉलनी, विनोद प्रभाकर चौधरी वय ४५ राहणार शनी मंदिर , शेख तासलीम शेख मनवर वय ४२ राहणार खडका रोड रामदेव बाबा मंदिराजवळ , अब्दुल नदीम अब्दुल रौफ वय ४० राहणार जाम मोहल्ला नईम पहेलवान यांच्या घराजवळ , चिरोगोद्दीन शेख अहमद वय ४० राहणार खडका चौफुली मन्नत अपार्टमेंट ,रहीम शेख गनी वय ४४ राहणार फकीर वाडा , सिराज मोहम्मद शेख वय 36 राहणार फकीर वाडा जाम मोहल्ला , फिरोजशहा बशीर शहा वय २९ राहणार मुस्लिम कॉलनी , सर्व राहणार भुसावळ हे सर्व एका बेडवर गोलाकार बसून तीन पानी जुगाराचा खेळ पैसे लावून खेळत असतांना रोख रक्कम ४५,२७० रुपये , जुगाराचे साहित्य व मोबाईल फोन , असा एकूण १,२५,२७० च्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पोकॉ प्रशांत रमेश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई जुगार अँक्ट कलम ४,५ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत सपोनि अनिल मोरे पोलीस नाईक रविंद्र बिऱ्हाडे,पोकॉ दिनेश कापडणे, परेश बिऱ्हाडे, सुभाष साबळे यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *