कोरोना रुग्ण संख्या घटू लागली : 24 तासात 161 बाधीत आढळले ; चौघा रुग्णांचा मृत्यू ; एकाच दिवसात 433 रुग्णांची मात :


जळगाव –
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने घट होत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे. गेल्या 24 तासात चौघा रुग्णांचा मृत्यू झाला असून नव्याने 161 बाधीत आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 39 हजार 827 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 31 हजार 384 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत दोन हजार 528 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 433 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *