भुसावळ पालिकेला वाढीव नऊ कोटींचा निधी मंजूर ;


भुसावळ –
अनूसूचित जाती उपयोजना लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेतून भुसावळ पालिकेला दलित वस्तीत सुधारणांसाठी आठ कोटी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. यापूर्वी पालिकेला हा निधी मिळत असलातरी त्याचे प्रमाण अल्प असल्याने आमदार संजय सावकारे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या काळात अधिक निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याने आता पालिकेला वाढीव निधी मिळण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये विकासकामे होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *