भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड १९ महामारी मध्ये सर्व ठिकाणी भीषण परिस्थतीशी सामना करीत आहे, त्यामध्ये भुसावळ रेल्वे हॉस्पिटल सुद्धा या महामारी दरम्यान सर्वतोपरी प्रयत्न पणाला लावूनअविरतपणे
रुग्ण सेवा करीत आहे.
भुसावळ रेल्वे विभागामध्ये रेल्वे कर्मचारी यांच्या साठी विशेष कोविड कक्ष बनविण्यात आले असून कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी उत्तमप्रकारे घेतली जाते .
या कोविड कक्षामध्ये एकूण १२८ बेडची व्यवस्था करण्यात आली असून सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण बेडला ऑक्सिजन पाईप लाईन द्वारा व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटल मध्ये सर्व कोविड रुग्णावर उपचार व्यवस्थित करून त्यांची उत्तम प्रकारे निगा राखली जाते. यामध्ये महत्वाची भूमिका डॉक्टर स्टाफ , मेडिकल स्टाफ, नसिंग स्टाफ बजावत आहे. यामध्ये उपचार करणारे सर्व रेल्वे चे स्टाफ आहे. रुग्णांना औषधीची तसेच रेमडीसीवर कमतरता होणार नाही याची काळजी घेऊन मध्य रेल्वे भायखळा हॉस्पिटल मधून सर्व मेडिसिन औषधीचा स्टॉक करून ठेवला आहे.
या हॉस्पिटलमध्ये मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता आणि मुख्य चिकित्सा अधीक्षक श्रवण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आला आहे. मध्य रेल्वे भुसावळ रेल्वे हॉस्पिटल येथे हा पहिलाच प्लांट आहे यामुळे ऑक्सिजनची कमतरता हॉस्पिटल आणि कोविड रुग्णांना होणार नाही आणि रेल्वेला बाहेरून ऑक्सिजन विकत आणावा लागणार नाही.
ऑक्सिजन प्लांट मधून ९१ लिटर प्रति मिनिट ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत आहे. हा प्लांट ०२ नोव्हेबर २०२० ला सुरु करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांट मुळे २० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर रिफील केले जाऊ शकतात. यामुळे रेल्वे हॉस्पिटलला कधीही ऑक्सिजनची गरज भासली नाही. हॉस्पिटल मध्ये रुग्णांना भरती करण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत त्याची काळजी घेतली जाते त्यांच्या मनापासून भीती काढून योग्य प्रकारे उपचार केले जातात वैद्यकीय अधिकारी ,नर्सिंग स्टाफ , सफाई कर्मचारी त्याची देखभाल करतात आणि यामुळेच रुग्णाचा रिकव्हरी रेट ९८% आहे आतापर्यंत रेल्वे हॉस्पिटल मध्ये ३३१३ रुग्णांनी यशस्वी पणे उपचार घेऊन घरी सुखरूप आले आहे.त्यामध्ये ४४५ रुग्ण बाहेरील आणि २८६८ रुग्ण रेल्वेतील आहे.
गृह विलगीकरण करण्यात आलेले रुग्णाची विशेष काळजी घेऊन दररोज चौकशी करून औषधी चे योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते. या रेल्वे हॉस्पिटल मधील कोविड कक्षामध्ये कार्य करत असलेल्या नर्सिंग स्टाफ ने आपले अनुभव सांगितले आहे –

श्रीमती लता सी पाटील-नर्सिंग स्टाफ
या कोविड वॉर्ड मध्ये कार्य करताना मी माझी स्वतःची काळजी घेऊन परिवार सुध्द्धा घेत आहे. रुग्णांना वेळोवेळी औषधी ,जेवण ,आहार योग्यप्रकारे झाले पाहिजेत म्हूणन काळजी घेत आहे.
श्रीमती वाहिदा खान-नर्सिंग स्टाफ
माझी जवाबदारी आहे कि हॉस्पिटल मधील संपूर्ण कक्ष ची साफसफाई ,बायो मेडिकल वेस्ट (घनकचरा )योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे त्यासोबत रुग्णाची आरोग्य ची काळजी घेणे यामध्ये आम्हला सर्व साफ सफाई कर्मचारी यांची मदत होते.


