हँडवॉश स्टेशन साकेगाव ग्रामपंचायतीचा आदर्श व प्रेरणादायी उपक्रम- आमदार संजय सावकारे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना महामारी सर्वत्र धुमाकूळ घालीत असतांना स्मार्ट विलेज साकेगाव पंधरा हजार लोकवस्तीच्या गावात कोरोनाचा आज एकही रुग्ण नसुन ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील चौकाचौकात हँडवॉश स्टेशन उभारण्याचा निर्णय इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी साकेगाव ग्रामपंचायतीचे हँडवॉश स्टेशन उद्घाटन प्रसंगी केले
यावेळी सरपंच आनंद ठाकरे ,संजय पाटील ,माजी सरपंच अनिल पाटील ,माणिक पाटील ,सुभाष कोळी, डॉक्टर बाळासाहेब पाटील ,सरपंच पती विष्णू सोनवणे, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे गजानन कोळी हिम्मत सोनवणे कुंदन कोळी गजानन पवार सागर सोनवाल भूषणसिंग राजपूत अजय चौधरी संतोष पाटील विलास ठोके सहा गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती
गावातील चौकाचौकात हांड वाश स्टेशन उभारल्यामुळे गावात येणारा प्रत्येक व्यक्ती निर्जंतुकीकरण होउनच गावात संचार करेल त्यामुळे गावात कोरोणाचाप्रादुर्भाव होण्यास आळा बसेल व साकेगाव स्मार्ट व्हिलेज प्रशासन सदैव कोरोनामुक्त राहील असा विश्वास आमदार श्री सावकारे साहेब यांनी व्यक्त केला या उपक्रमाचा आदर्श तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने घेतल्यास तालुका पूर्णा मुक्त होईल अशी आशा त्यांनी व्यक्त करून स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले
गेल्या काही महिन्यांमध्ये गावात कोरोना च्या संदर्भात भीषण परिस्थिती होती त्यावर मात करीत गावातील आरोग्य केंद्र स्थानिक डॉक्टर अंगणवाडी सेविका मदतनीस सर्व शिक्षक वर्ग व ग्रामपंचायत प्रशासन आदींनी परिश्रम घेऊन गावात जनजागृती करून गावाला पूर्णपणे केल्याचा आनंद असून वरील सर्व सन्माननीय मान्यवरांचे व ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन श्री सावकार साहेबांनी करीत ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना अकरा हजाराचे बक्षीस दिले त्याबद्दल आमदार संजय भाऊ सावकारे यांचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच ठाकरे यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *