भुसावळ (प्रतिनिधी )-
पालिकेतील करोना कर्मचारी योध्यांसाठी विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करावा अशी मागणी करण्यात आली असून याबाबत भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे करण्यात आली असून निवेदन देण्यात आले
. केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाच आदेश दि.२८.०३.२०२० राज्य शासनाच्या वित्त विभाग मंत्रालय आदेश दि. २९.०५.२०२० , नगरविकास विभाग ,महाराष्ट्र शासन यांचे पत्र दि, २३.११.२०२० आणि ०९.०२.२०२१ , नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मुंबई यांचे पत्र दि.११.०२.२०२१ या संदर्भानुसार नगरविकास प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी कॉविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कॉविड संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची तसेच केंद्र/राज्य सरकारने लागू केलेल्या करोना विमा कवच लाभ याविषयी 11 मुद्यांवर तपशीलवार माहिती मागितली आहे,
यात प्रामुख्याने
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार अनु.३ (ब)(५) नुसार किती महानगरपालिका/नगरपालिका/मागर्परीषद/नगरपंचायतीनी या योजनेसार्खीच सानुग्र्हाय सहाय्याची योजना लागू केली आहे का? असल्यास त्याचा परिपूर्ण तपशीलासह सदर योजना लागू करण्यासाठी कोणत्या अडचणी होत्या त्यांचे स्पष्टीकरण
सदर योजना सारखीच योजना लागू करण्याची पात्रता/कुवत आहे किवा कसे ? तसेच यीजना लागू करावयाच्या झाल्यास निधीची उपलब्धता कश्या प्रकारे करण्यात येणार आहे
वरील मुद्द्यांवर माहिती अपेक्षीत असून मात्र आता भुसावळ नगरपालिका कोणत्या मुद्द्यावर खुलासा करते हे सर्व भुसावळकरांना समजेल.
“अ” वर्ग नगरपरिषद असून देखील आजतागायत या शासन निर्णयाकडे नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींनी कारवाई केली नाही. करोना महामारीमध्ये ज्या-ज्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांनी जीवाची पर्वा न करता करोना काळात कार्य केले, प्रसंगी करोना संक्रमण होऊन मयत झाले तरी त्यांच्या बददल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल भुसावळ नगरपालिकेला कुठलेही आस्था दिसून येत नाही. असे ६०० च्या जवळपास कर्मचारी आहेत.
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी भुसावळ च्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत ,
करोना संक्रमणाची दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता संपूर्ण भुसावळ नगरपरिषद कर्मचारी,अधिकारी वर्गाची केंद्र/राज्य सरकार् सारखी “ करोना विमा कवच योजना “ काढण्यात यावी.
शहीद झालेले करोना योध्या कै.प्रकाश दुरकुले आणि कै. विजयसिंग राजपुत यांना एकरकमी सानुग्रहाय मदत म्हणून प्रत्येकी २१ लाख रु. देण्यात यावे.
वरील बाबींची पूर्तता पुढील १५ दिवसात करण्यात यावी अन्यथा शिशिर जावळे , डॉ. नितु पाटील,सहसंयोजक, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी, भाजप भुसावळच्या वतीने नगरपरिषद समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी
डॉ. नितु पाटील,
सहसंयोजक, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी, भाजप
रमाशंकर दुबे, उत्तर भारतीय आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष,
परीक्षित बऱ्हाटे,शहर अध्यक्ष, भाजप भुसावळ,
संदीप सुरवाडे,शिशिर जावळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी ,जळगाव जिल्हा, श्री रक्षाताई खडसे आ.संजय सावकारे तहसीलदार ,भुसावळ विभाग यांनाही निवेदन देण्यात आले आहे .


