दुसरी लाट भयंकर स्वरूपाची असल्याने ट्रामा सेंटरमध्ये कोरोनावर उपचार सुरू करावेत – बबलु ब-हाटे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

भुसावळातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच केंद्रे बंद केल्याने असुविधा होत आहे. येत्या काही दिवसांत रूग्ण वाढले तर प्रशासनाचीच चिंता वाढेल आणि विपरित परिस्थितीचा सामना करण्यास दमछाक होईल. यासाठी ट्रामा सेंटरमध्ये कोरोनावर उपचार सुरू करावेत
अशी मागणी येथील शिवसेना शहर प्रमुख बबलू ब-हाटे यांनी
आरोग्य अधिकारी,
ट्रामा सेंटर-ग्रामीण रुग्णालय यांचेकडे केली असून निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना या वैश्विक महामारीला राज्यात नियंत्रित करण्यासाठी यशस्वी नियोजन केले आहे. कोरोना बाधित रुग्णास उपचार त्वरित मिळावे यासाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू केले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, भुसावळात २४ पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे त्यातच रेल्वे दवाखान्यात फक्त रेल्वे कर्मचारी ऍडमिट करून घेत असून सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.
राज्य शासन तयारीत असतांना भुसावळातील कोविड सेंटर बंद केले आहे. कोविड सेंटरमुळे गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले. मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड रुग्णालये बंद केली ते ठीक आहे परंतु भुसावळातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच केंद्रे बंद केल्याने असुविधा होत आहे. येत्या काही दिवसांत रूग्ण वाढले तर प्रशासनाचीच चिंता वाढेल आणि विपरित परिस्थितीचा सामना करण्यास दमछाक होईल. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास यांच्याकडेही निवेदन सादर केले आहे.
त्यामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील कोविड सेंटर कोरोनाची संभाव्य दुसऱ्या लाटेचे संकटशी सामना करण्यासाठी जनहितासाठी ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार सुरू करावे, म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडेही मागणी केली असल्याचे शिवसेना शहर प्रमुख बबलू ब-हाटे यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *