पुणे ते हावडा दरम्यान दैनिक सुपरफास्ट विशेष ट्रेन धावणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )
प्रवाशांची जादा गर्दी दूर करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत रेल्वेने पुणे आणि हावडा दरम्यान दररोज विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहेः

*02279 डाउन सुपरफास्ट स्पेशल दिनांक 16.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत पुणे येथून दररोज 18.35 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी हावडा येथे 03.55 वाजता पोहोचेल.
*02280 अप सुपरफास्ट स्पेशल दिनांक 14.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत हावडा स्टेशन येथून दररोज 22.10 वाजता सुटेल आणि पुण्याला तिसर्‍या दिवशी 07.05 वाजता पोहोचेल.

हॉल्ट्स: दौंड कोर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा रोड, तुमसर, गोंदिया, डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भटपारा ,बिलासपूर, चांपा, रायगड, बजरंगनगर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर

रचनाः दोन एसी -2 टायर, सहा एसी -3 टायर, 10 स्लीपर क्लास, 5 द्वितीय श्रेणी आणि एक पेंट्री कार.

आरक्षण: पूर्णपणे आरक्षित विशेष ट्रेन क्र. 02279 सामान्य भाड्याने 12.02.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होतील.

उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया 
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या
किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *