भुसावळ विभागातून किसान रेल द्वारा एका दिवसामध्ये रेकॉर्डब्रेक 706 टन ची लोडींग –


भुसावळ (प्रतिनिधी )-
किसान रेल देवळाली ते मुजफ्फरपुर या दरम्यान सुरू करण्यात आली. या किसान रेल चा माध्यमातून विविध राज्य विविध स्टेशन मध्ये मालाची वाहतूक करण्यात आली आहे .भुसावळ विभागातून चालवण्यात येत असलेल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून दिनांक 26.01.2021 ला रेकॉर्ड ब्रेक 706 टन ची लोडींग भुसावळ विभागातून करण्यात आली आहे.ही लोडिंग भुसावळ विभागातून विविध स्टेशन वरून करण्यात आली आहे. देवळाली ते मुजफ्फरपुर किसान रेलमध्ये 261 टन , सांगोला ते आदर्श नगर 436 टन केळी, आणि सांगोला ते शालिमार 9 टन मालाची वाहतूक अशी करण्यात आली आहे. एकूण 706 टन ची मालाची वाहतूक एका दिवसामध्ये भुसावळ विभागातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *