दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर प्राणघातक हल्ला ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
दारु पिण्याकरीता पैसे न दिल्याचा राग आल्याचे कारणावरुन जामनेर रोडवरील दिनदयाल नगर भागात तिन जणांनी एकावर चाकू हल्ला केल्याची घटना ३० रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील जामनेर रोडवरील दिनदयाल नगर भागातील चांद शेख हमीद यांच्या घरात संशयित आरोपी अजय डिगंबर जाधव, वय २४ याच्यासह दोन ते तीन जण नाव, गाव माहित नाही यांनी फिर्यादी संतोष अहिरे यास दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता संतोष याने नकार दिला. याचा राग आल्याने संशयित आरोपी अजय जाधव व साथीदार यांनी खिशातील चाकु बाहेर काढून संतोष अहिरे यांच्यावर वार केला. यामध्ये अहिरे जखमी झाला याप्रकरणी संतोष अहिरे यांनी फिर्याद दिल्यावरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अजय जाधव सह अन्य तीन जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ. जयराम खोडपे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *