शिक्षकाना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड -१९ च्या कामातून कार्यमुक्त करा प्रोटॉन संघटनेची मागणी


प्रतिनिधी भुसावळ
तालुक्यामध्ये प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना च्या कामांमध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे या नियुक्त रद्द करून कार्यमुक्त करण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी प्रोटॉन संघटनेकडून कडून भुसावळचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन केली
निवेदनात म्हटले आहे की शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपत्तीजनक परिस्थितीत शासनाला अनेक वेळा मदत केलेली आहे कोविड -१९ च्या प्रदूर्भावाच्या काळात चेक पोस्ट वरील सेवा,स्वस्त धान्य दुकाना वरील सेवा, विलगीकरण केंद्र सेंटर सेवा,इतकेच नाही तर घरी घरी जाऊन सर्वे जीव धोक्यात टाकून आपल्या कुटूंबाचा विचार न करता प्रमाणिकतेने सेवाभावी वृत्तीने केले आहे आणि अजून ही करीत आहे १५ जून २०२० पासून शाळा महा विद्यालयाचे नियमित शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ऑन लाईन शिक्षण देण्याचे कार्य शिक्षक पार पाडीत आहे तर प्रवेशा संदर्भातील सर्व ऑफ लाईन प्रक्रिया शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षक राबीत आहे
शिक्षकांना आपले अध्यापनाचे काम नियमित पणे व सातत्याने पूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या साठी कोविड -१९ च्या संबधीत कार्यासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकाना कामातून कार्यमुक्त करण्यात यावे आशा प्रकारे शासन निर्णय दि १७/८/२०२० रोजी काढण्यात आला असून जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी साहेब यांनी देखील ह्याच शासन आदेशाचा संदर्भ घेत दि २८/८/२०२० रोजी शिक्षकांना अध्यापनाच्या कामा करिता कार्यमुक्त करण्या सदर्भातील पत्र काढलेले आहे असे असताना देखील शिक्षकांना माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत कामे देण्यात येत आहे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी काढलेले दि २८/८/२०२० चे पत्र रद्द झाले का? असा प्रश्न जिल्ह्यात शिक्षकान समोर निर्माण झालेला आहे तसेच अनेक ठिकाणी उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्या यांना देखील डीयुट्या लावलेल्या असल्याचे समजते शिक्षकांना ऑन लाईन अध्यापनाच्या कामा करिता कोविड -1९ च्या कामातून कार्यमुक्त करण्यात यावे ज्या शिक्षकांना उच्च रक्तदाब व मधुमेहा सारख्या गंभीर आजार आहे यांना तत्काळ कार्यमुक्त करावे अशी मागणी भुसावळ तालुक्यातून प्रोटॉन संघटनेच्यावतीने करण्यात आलेली असून जेष्ठ शिक्षक सुभाष एस पाटील याच्या नेतृत्वात भुसावल येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना ,दीपक तायडे,बाळू लहासे समाधान जाधव बी डी सुरवाडे योगेश सुरवाडे तसेच प्रोटॉन संघटनेचे म.रा सचिव जी पी काकडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *