भुसावळ ( प्रतिनिधी)

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत रविवार, दि. 20 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव आकाशवाणी केंद्रावर डॉ. जगदीश पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
डॉ. जगदीश पाटील हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती पुणे येथे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य असून आठवी, दहावी व बारावी वर्गासाठी मराठी विषयांच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चितीसाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी संपूर्ण देशभरात जी चर्चासत्रे आयोजित केली, त्यामध्ये औरंगाबाद येथे आयोजित पहिल्याच राज्यस्तरीय चर्चासत्रात जळगाव जिल्ह्यातील एकमेव शिक्षक म्हणून डॉ. जगदीश पाटील यांचा सहभाग होता. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ध्येय व प्रमुख तत्त्वे, सार्वत्रिक प्रवेशाची प्रक्रिया, नवीन शैक्षणिक रचना, पायाभूत शिक्षण, अभ्यासक्रम रचना, शाळा व शिक्षक, राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना, अंमलबजावणीची रूपरेषा यासंदर्भात डॉ. जगदीश पाटील यांची मुलाखत आकाशवाणीचे निवेदक डॉ. श्रीकांत दाणी घेणार आहेत.


