यावल चोपडा मार्गावर भरधाव आयशरच्या धडकेत बुलढाणा जिल्ह्यातील दाम्पत्य ठार ;


यावल -यावल चोपडा मार्गावर भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील दाम्पत्य ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.
पूनमसिंह रतन सिंह राजपूत (52) व त्यांच्या पत्नी संगीताबाई पूनमसिंग राजपूत (48, रा.आसलगाव, ता.जळगाव जामोद, जि.बुलढाणा) हे
दुचाकी (एम. एच. 30 ए.जे. 1884) ने यावलकडून चोपडा येथे जात असताना चोपड्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर (जी.जे. 27 व्ही.5838) वरील चालक तौफीक पठाण (रा.अहमदाबाद) ने जोरदार धडक दिली यात दुचाकी वरील राजपूत दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघात झाल्याचे समजताच चिंचोली येथील रामकृष्ण कोळी व किनगाव येथील बबलू कोळी यांनी यावल पोलिसांनी माहिती दिली. यावलचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व हवालदार सुनील तायडे विकास सोनवणे यांनी मृतदेह यावल येथे ग्रामीण रुग्णालयात हलवले. या अपघाताबाबत संजय अलकारी (रा.शिरसाड, ता.यावल) यांंच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *