भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना काळात एकी कडे लाखो युवकांना आपले रोजगार गमवणाची वेळ शिक्षित वर्गावर आली असून भुसावळ येथील आदर्श हाय टेक प्रा.आय टी आय आणि महाजन प्रा.आय टी आय रावेर येथील प्रशिक्षणार्थ्यांना विराज प्रोफाईल्स लिमिटेड,भोईसर येथे कायमस्वरूपी रोजगार मिळवून देउन एक नवीन आदर्श आय टी आय क्षेत्रात निर्माण केला असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी येथील आय टी आय मधून तीस प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळालेला आहे .
पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रा जयंत लेकुरवाळे यांनी विद्यार्थ्याना मिळालेल्या कोरोना काळातील संधीचे सोने करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच त्याचे पालक सुद्धा उपस्थित असून असून दोन्ही संस्थेच्या एकूण तीस विद्यार्थांच्या खाजगी बसला हिरवी झेंडी दाखवूंन जयंत लेकुरवाडे यांनी बस रवाना केली विशेष अतिथी म्हणून डॉ.वसंत झारखंडे उपस्थित होते त्यानी विद्यार्थ्यांना कोरोना काळात आपण काम करण्याच्या ठिकाणी आपली काळजी कशी घ्यावी या वर आपले मार्गदर्शन केले असून पुढील भविष्या साठी शुभेच्छा दिल्या .
संस्थेचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी आपल्या मनोगतात पालकांना उद्देशून संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराचा दिलेला शब्द पूर्ण केला असून पुढे सुद्धा आदर्श आणि महाजन आय टी आय च्या विद्यमानाने रोजगार भिमुख प्रशिक्षण देउन रोजगाराच्या संधी उपलब्द करू असे संबोधले.कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शिवाजी पाटील ,प्राजक्त पाटील ,प्रशांत पाटील तसेच दोन्ही आय टी आय चे प्राचार्य कुरेशी, प्राचार्य तडवी सह निर्देशक वर्ग उपस्थित होते .



