भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनद्वारे आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी भुसावळ -चांगसरी दरम्यान 4 सप्टेंबर पासून विशेष पार्सल गाड़ी चालवन्यात येणार आहे. लोकाना काही सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळपासच्या स्टेशनमधे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .
यामध्ये गाडी क्र- 00139 भुसावळ -चांगसरी दरम्यान विशेष पार्सल गाड़ी
ही गाड़ी दिनांक 4 सप्टेंबर ला 1 वाजता भुसावळ स्थानका वरून प्रस्थान करेल आणि तीसरा दिवशी चांगसरीला 9 वाजता पोहचेल .
या गाडीला पुढील ठिकाणी थांबा देण्यात आला आहे . डाउन दिशा – भुसावळ 1 , नागपुर 7.15/7.45, दुर्ग , बिलासपुर , झारसुगड़ा , टाटानगर, दानकुनी, खरगपुर, मालदा टाउन, न्यू जलपाई गुडी, न्यू बोंगाईगांव या ठिकाणी थांबेल . गाडी क्र- 00140 चांगसरी – भुसावळ दरम्यान विशेष पार्सल गाड़ी ही गाड़ी दिनांक 6 सप्टेंबरला 11.30 वाजता चांगसरी स्थानका वरून प्रस्थान करेल आणि तीसरा दिवशी भुसावळ ला 11.20 वाजता पोहचेल.
थांबा
अप दिशा – न्यू बोंगाईगांव, न्यू जलपाई गुडी, मालदा टाउन, खरगपुर, दानकुनी, टाटानगर, झारसुगड़ा, बिलासपुर, दुर्ग, नागपुर 3.30/4 भुसावळ 11.20 या ठिकाणी थांबेल .



