भुसावळ व रावेर येथे सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत


भुसावळ /रावेर (प्रतिनिधी ) –
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा शहर व परिसरात ठिकठिकाणी गणेश विसर्जन शांततेत करण्यात आले. प्रथमच ना ढोल ,ताशा,नगारे , डीजे ,आदीं सवादय आवाज विरहित तसेच मिरवणूक नाही, गुलालाची उधळन नव्हती यामुळे विसर्जनाला उदासीनता दीसुन आली . गणेश भक्तांनी घरीच टब मध्ये विसर्जन केले तर अनेकांनी गणेश मूर्ती संकलन केंद्रावर दान (जमा ) केल्या.
येथील जय गणेश फाऊंडेशन च्या नवसाच्या गणपतीचे विसर्जन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवू दिलेल्या नियमानुसार करण्यात आले.
जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाचा गणपतीचा गणेशोत्सव दरवर्षी उत्साहात सांस्कृतिक गणेशोत्सव म्हणून शहर व परिसरात प्रसिद्ध आहे. सलग दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम तथा विद्यार्थी, युवक-युवती व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा व व्याख्यानांचे आयोजन केले जाते. परंतु या वर्षी कोरोना महामारीमुळे जनता व प्रशासन त्रस्त असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांत राहून गणेशोत्सव हा ‘ मानवी जीवनाचा मदतोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. यात बाप्पाचा प्रसाद म्हणून गोरगरीब जनतेला धान्य वाटप, आर्सेनिक अल्बम व व्हिटॅमिन सी व इतर औषधीचे वाटप तसेच वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले.
पुण्या- मुंबईच्या धर्तीवर नवसाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक दरवर्षी पारंपरिक वाद्य व पालखी द्वारे काढण्यात येते, ते शहरातील नागरीकांसाठी आकर्षण असते. परंतु यावर्षी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाकडून मूर्तीचे विसर्जन मंडळाच्या परिसरातच ३०,३५ सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले, दरवर्षी प्रमाणे शाळू मातीची मुर्ती असल्याने विसर्जनाचे पाणी व माती १५ फूट उंचीचा वृक्ष लावून त्याला टाकण्यात आले.
यावेळी जय गणेश फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, रोटरी माजी अध्यक्ष अरुण मांडळकर, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुषार झांबरे, सुधीर देशपांडे, हर्षल वानखेडे, राहुल भावसेकर, महेंद्र महाजन, खेमचंद्र भंगाळे, शुभम नेमाडे,रवि पाटील, अरविंद बोंडे, देवेंद्र राजपूत आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
रावेर येथे शांततेत गणेश विसर्जन-
रावेर शहर हद्दीतील ११ सार्वजनिक व ९ खाजगी तसेच ग्रामिन हद्दीतील सार्वजनिक १० व खाजगी ११ असे एकूण ४१ गणपती मूर्तीचे अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, डिवायएसपी नरेंद्र पिंगळे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली शांततेत विसर्जन झालेले असून आरएपी प्लाटून, एसआरपीएफ प्लाटून,होमगार्ड ,रावेर पोलीस असा खुप तगडा बंदोबस्त देण्यात आलेला होता, न पा तर्फे गणपती मूर्ती संकलन करिता ठेण्यात वाहने ठेवण्यात आली होती.तहसीलदार उषाराणी देवगुणे, सीओ लांडे यांनी यांच्या उपस्थितीत शांततेत गणेश विसर्जन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *