भुसावळ (प्रतिनिधी )-
चाकूच्या धाकावर लूट करीत अन्य किराणा व्यावसायीकास चाकू दाखवून दरमहा खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यातील पसार आरोपी तस्लिम उर्फ काल्या सलीम शेख (२८, रा.दीनदयाल नगर, भुसावळ) यास मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तक्रारदार तुषार माणिक चौधरी (रा.विकास कॉलनी, भुसावळ) यांना ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तस्लिम उर्फ काल्या याने चाकूचा धाक दाखवून एक हजार पाचशे रुपये लुटले होते तसेच तक्रारदार मनोजकुमार अशोककुमार वाढवणी (रा.भुसावळ) यांच्याकडे ३१ रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपीने चाकूचा धाक दाखवून दरमहा पाच हजारांचा किराणा मालन दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आले होते. आरोपी दिनदयाल नगरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, जयराम खोडपे, किशोर महाजन, रवींद्र बिर्हाडे, समाधान पाटील, रमण सुरळकर, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुर्खें वाहन चालक बंटी कापडणे आदींनी ही कारवाई केली.



