भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या भुसावळमध्ये मंगळवार व शनिवर रोजी संचारबंदी आहे, नागरिक काटेकोरपणे संचारबंदीचे पालन करीत आहोत. रस्त्यावर यादिवशी रहदारी कमी आहे म्हणून जळगाव रोड- नवोदय चौफुली ते यावल नाका रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे, कारण दोन दोन फुटाचे खड्डे रस्त्यावर असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या एका वर्षात चार वेळेस या रस्त्याची दुरुस्ती वेगवेगळ्या कारणांमुळे झाली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुसावळ भेटीच्या दोन वेळेस तसेच गणेशोत्सव व नवरात्री मुख्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र यावर्षी अजून दुरुस्ती नाही. पावसामुळे हे खड्डे आणखी मोठे होतील आणि अपघाताची संख्या वाढेल. मागील काही वर्षांत खड्ड्यामुळे अपघातात अनेक जण दगावले आहेत त्यात याच रस्त्यावरील अनेक ठिकाणची स्ट्रीट लाईट बंद आहे. आज प्रशासनासोबत नागरिकांची सुद्धा मोठी जबाबदारी म्हणजे कोरोना वर मात करणे आहे, परंतु रस्त्यावरील खड्डयामुळे जीव गेला तर जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल. भोईनगर, काच बंगला, लोणारी हॉल येथील खड्डे सर्वांसाठी धोकेदायक बनले आहेत. भुसावळ नगरपालिका प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी जळगाव रोडचे रहिवासी शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, डॉ.भूषण भारंबे, अमोल पाटील, बापू राणे, महेश कोळी, हर्षल पाटील, दीपक भोई, सुरज चौधरी यांनी केली आहे.



