निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र संस्था जिल्हाध्यक्षपदी नाना पाटील ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-
येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील जेष्ठ शिक्षक व विविध उपक्रम सातत्याने सक्रिय असणारे नाना पाटील सर यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थाध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी ही नियुक्ती पत्राद्वारे केली आहे. नाना पाटील यांनी आपल्या सेवा कालावधीत सातत्याने शैक्षणिकसह सामाजिक उपक्रमात उत्कृष्ट कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे. ग्राहक पंचायत जिल्हा सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. ज्ञानासह मनोरंजन गृपसह विविध संस्था व संघटनांमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी होवून उत्तम कार्य केले आहे. त्यांना असलेली पर्यावरण आवड व जनजागृती याविषयीचे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक चळवळ निर्माण होऊन लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, त्यासाठी संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी लवकरच तयार करणार असल्याचे नाना पाटील यांनी सांगितले. जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे बापूसाहेब मांडे, सोनूभाऊ मांडे, ज्ञानासह मनोरंजन गृप यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक व्यक्ती व संघटनांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *