विशेष यात्री सेवा गाडीमध्ये तत्काल तिकीटाची सुविधा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी दिनांक २९ जून २०२० पासून विशेष गाडीमध्ये तत्काल तिकीटाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे . सर्व विशेष गाड्या ज्यांचा नंबर शून्य पासून गाड्यांची सुरुवात होते त्या गाड्यांमध्ये हा कोटा असणार आहे. दिनांक २९ जून २०२० पासून यात्रा दिनांक ३० जून २०२० चे तत्काल तिकीटाची सुविधा उपलब्ध होईल. सर्व आरक्षण केंद्रावर आणि ऑनलाईन वर सुविधा उपलब्ध होणार आहे.असेही रेल्वे प्रशासनाने कळविले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *