भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील प्राथमिक,ग्रामीण व नगरपरिषद आरोग्य केंद्रासाठी आमदार निधीतुन कोरोना सारख्या संर्संगजन्य आजारावर मात करण्यासाठी ५० लाखांचे साहित्य २२ जून रोजी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रामध्ये वाटप करण्यात आले . यासाहित्य मध्ये आरोग्य विभागाच्या पथकासाठी लागणारे पीपीई कीट व तीन प्रकारचे , सर्जिकल साहित्य,मास्क, सॅनीटायझर स्टँडसह लागणारे सर्व साहित्य वाटप केले .जिल्ह्या मधुन सर्व प्रथम भुसावळ तालुक्यासाठी साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून आ.सावकारे यांनी पाठपुरावा केल्याने सर्वात अगोदर तालुक्यासाठी साहित्य उपलब्ध करण्यात आले असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. दिलीप पाटोळे यांनी सांगितले .
तर तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रासाठी २० लाख व दोन ग्रामीण आरोग्य केंद्रासाठी २० लाख व नगरपरिषद रूग्णालयासाठी १० लाख असे एकूण ५० लाखाचे साहित्य आ. सावकारे यांनी तालुक्यासाठी उपलब्ध करुन दिले. यावेळी आ. संजय सावकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.दिलीप पाटोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद पांढरे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.संगीता पांढरे,किन्ही केंद्राचे डाॅ.कल्पना दवंगे,डाॅ साजीया शेख,पिंपळगाव केंद्राचे फार्मसिस्ट मनोहर कोळी, किन्हीचे मा.उपसंरपच बंटी सोनवणे,मा.संरपच अरुण चौधरी,सर्वोदय हायस्कुलचे चेअरमन सुरेश येवले,पंढरी बोंडे,दिलीप सुरवाडे,पोलीस पाटिल,राजु तायडे,दिलीप सुरवाडे,संजय सुरवाडे,किरण घुले यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.



