घरफोडीतील कुख्यात आरोपी अटकेत ; जिवंत काडतुस व गावठी कट्टा हस्तगत ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
घरफोडी प्रकरणातील फरार दोघां आरोपीना शहरातील जाम मोहल्ला भागातून बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून पकडले असता त्यांचे जवळून गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत केले आहे . आरोपी अटक दरम्यान कट्टा जमिनीवर पडल्याने फायर झाले .सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक २१ जून २०२० रोजी ३.३० वाजेच्या सुमारास भाग ५ गु.र.न.५८८/२०२० भा.द.वि.कलम ४५४, ४५७ ,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपी अलतमश रशीद शेख वय २१ राहणार जाम मोहल्ला भुसावळ , जहीर सलीमोद्दीन सय्यद ,वय १९, राहणार मुस्लिम कॉलनी भुसावळ याची सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून दोघां आरोपी यांना भुसावळ शहरातून जाम मोहल्ला भागातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले असून आरोपी अलतमश रशीद याची अंगझडती घेत असतांना तो झटापट करू लागला व त्याच दरम्यान त्याचे कमरेतून एक गावठी कट्टा (बनावटीच्या पिस्टल) खाली पडून एक राऊंड जमीनीच्या दिशेने फायर झाले . सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही .तसेच त्याचेकडून दोन जिवंत काडतुस व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आले असून आरोपी जहीर सलीमोद्दीन सय्यद याच्या कडून एक चाकू हस्तगत करण्यात आला असून त्याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम -3/25, 3/27 प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे,पो ना किशोर महाजन, समाधान पाटील, रमण सुरळकर,रविंद्र बिऱ्हाडे, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील,पो कॉ विकास सातदिवे, श्रीकृष्ण देखमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *