माफक घरात ऑनलाइन शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे; ऑनलाईन शिक्षण काळाची गरज शैक्षणिक मंथन 2020 मध्ये चर्चा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या लॉक डाऊन असल्याने शाळा बंद आहेत परंतु यावर ती उपाययोजना म्हणून ऑनलाइन शिक्षण देण्याचा पर्याय समोर येत आहे यासाठी शैक्षणिक मंथन 2020 म्हणतं 2020 वेबिनार चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये माफक दरामध्ये ऑनलाइन शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे अशा प्रकारचा सूर उमटला .
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जळगाव नॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिस्ट भारत यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथून तीन दिवसीय शैक्षणिक मंथन 2020 वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनार चे प्रस्ताविक विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे यांनी करताना सांगितले की भविष्यातील शिक्षणाविषयी च्या वाटा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून या वेबिनार मध्ये तज्ञांकडून मते जाणून घेतली आहे यामुळे शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो यासाठी चर्चा घडवून आणलेली आहे
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑल इंडिया रामानजन मॅथ क्लबचे चेअरमन चंद्रमौली जोशी यांनी विद्यार्थ्यांना गणिताविषयी ची भिती मुलांमधून दुर झाली पाहिजे तसेच परंपरेने शिकवले जाणारे गणित न शिकवता विद्यार्थ्यांची रुची वाढेल अशा विविध साहित्यांनी गणित शिकवण्यास निश्चितपणे विद्यार्थी यामध्ये सक्रिय सहभाग घेतात

इस्रो संस्थेचे माजी वैज्ञानिक प्रो डॉ सुरेश नाईक यांनी अवकाश शिक्षणाच्या वाटा संधी आणि आव्हाने या विषयावर बोलताना सांगितले की ॲस्ट्रॉनॉमी व इस्रो या संस्थेत काम करण्याची संधी उपलब्ध असून भविष्यात विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये संधी उपलब्ध होतील तसेच भविष्यातील चंद्रयान 2, गगनयान, आदित्ययान, व्हीनस मोहीम, चंद्रयान 3, अवकाश स्थानक हे मोहीम होणार असून हि खूप मोठी आव्हाने भारतासमोर असून ते यशस्वी करण्यासाठी तज्ञांची मदत लागणार आहे यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत

अमेरिका इथून ऑनलाईन शिक्षण काळाची एक गरज या विषयावर इंटेल कॉर्पोरेशन चे वरिष्ठ संचालक बोलताना भूषण बोरोले म्हणाले की भारतात शिक्षणावर खूप खर्च कमी होतो पाश्चात्त्य देशांमध्ये ओपन यूनिवर्सिटी व दुरुस्त शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम घेऊन सर्टिफिकेट देखील मिळते यामुळे वेळ व पैसा देखील वाचतो याकरता भारताने देखील परवडणारी शिक्षण प्रणाली निर्माण केली पाहिजे ऑनलाइन शिक्षणामुळे स्वयम् गतीने शिकण्याची पद्धत असल्याने व शिकवण्याची गरज भासत नाही तसेच शिक्षकांना उच्च प्रतीचे प्रशिक्षण दिले पाहिजे प्रशिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे आणि यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे तसेच सर्वांना परवडणारे तंत्रज्ञान उभे केले पाहिजे सध्या भारताची लोकसंख्या 130 तीस करोड असून 123 करोड लोकांकडे आधार कार्ड 121 करोड लोकांकडे मोबाईल 44.6 करोड लोकांकडे स्मार्टफोन 56 करोड लोक इंटरनेट वापरत आहे त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीही भारतात सहजगत्या होऊ शकते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप
पाटील यांनी तर आभार आर वाय चौधरी यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *