भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राजीव पुरी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर आयुध निर्माणी बोर्डाने नूतन महाप्रबंधक म्हणुन वसंत निमजे यांची नियुक्ती केली असून ते रूजु झाले असुन त्यांनी पदभार स्वीकारला.
श्री.निमजे हे सन १९८८-८९ बॅचचे नियुक्त आयओएफएस अधिकारी आहेत. त्यांनी आयुध निर्माणी बोर्ड कोलकाता,खडकी (पुणे), वरणगाव, चंद्रपूर, अंबाझरी (नागपूर) अशा आयुध निर्माणीत विविध आयुध निर्माणीत उच्च पदावर कार्यभार सांभाळला आहे. अॅम्युनेशन-प्रोपलंट डेव्हलपमेंट, पिनाका पॉड लॉचिंग, मटेरीयल मॅनेजमेंटसह विभिन्न संरक्षण उत्पादनांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले.



