भुसावळ (प्रतिनिधी)-
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन व मार्केटबंदी असल्यामुळे फोटोग्राफी क्षेत्राला मोठे आर्थिक नुकसान झालेले असून छायाचित्रकार बेरोजगार झालेला आहे त्यामुळे भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष आनंद ठाकरे व उपाध्यक्ष बराटे यांनी दिनांक २० रोजी झालेल्या असोसिएशनच्या त्रेमासिक सभेत दिनांक एक जुलै पासून भुसावळ शहर व तालुक्यात फोटोग्राफी क्षेत्रात दरवाढ करण्यात येत असल्याचे निश्चित केलेले आहे प्रसंगी कोषाध्यक्ष अजय शिंपी सचिव राहुल पाटील सहसचिव राजीव भंगाळे सल्लागार निलेश कोल्हटकर अतुल शिंदे विनोद गोरधे आदींची उपस्थिती होती फोटोग्राफी क्षेत्रात मार्च एप्रिल मे आणि जून हे चार महिने लग्न समारंभ कार्यक्रमावर छायाचित्रकारांचे वार्षिक उत्पन्न अवलंबून असते मात्र चालू वर्षात कोरोना च्या संसर्गामुळे सर्व व्यवसाय ठप्प झालेला असून तालुक्यातील छायाचित्रकार पूर्णपणे बेरोजगार झालेला आहे त्यामुळे स्टुडिओ फोटोग्राफी व आउटडोअर फोटोग्राफी संदर्भात असोसिएशनच्या माध्यमातून दोन समित्या नेमण्यात आलेली असून त्या समित्यांचे अध्यक्ष लवकरच रेट जाहीर करतील स्टुडिओ समितीमध्ये श्रीकांत पवार योगेश उबाळे अविनाश साळी नितीन भालेराव महेंद्र बार्हे आदींची तर आउटडोअर फोटोग्राफी समितीमध्ये प्रकाश चौधरी राजू भंगाळे आकाश अग्रवाल अतुल शिंदे किशोर सोनवणे आदींची निवड करण्यात आलेली आहे छायाचित्रकारांना लोक डॉन मध्ये काम करण्यासाठी लवकरच छायाचित्रकारांना ओळखपत्र तसेच विमा संरक्षण देण्याचा निर्णय असोसिएशन ने घेतला तसेच ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग राबविणे, वृक्षारोपण करणे तसेच सामाजिक कार्यात सक्रिय सहयोग देणे शासनाच्या निर्देशांचे पूर्णपणे पालन करणे व कोरोना संदर्भात जनजागृती करणे तसेच दिनांक १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनाच्या पूर्व नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली व असोसिएशन उपाध्यक्ष बबलू बराटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला



