सावद्‍याचे ट्रान्सपोर्ट मालक रुग्ण उपचार करून घरी परतले

सावदा – येथील ख्वाजा नगर मधील रहिवाशी व फैजपूर रस्‍त्‍यावरील ट्रान्सपोर्टचे मालक काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यांचा आज दि.६ जुन शनिवार रोजी दुपारी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्‍यासह सावदाकरांना दिलासा मिळाला आहे .त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांना रुग्णालयातून आज दुपारी घरी पाठवण्यात आले.कोरोना मुक्‍त चांगले होऊन येणारे ते शहरातील पहिलेच पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्‍या कुटुंबियांसह आप्तेष्‍ठांनी त्यांचे पुष्‍पवृष्‍ठी करून जंगी स्वागत केले.
सावदा शहरात आतापर्यंत ३२ रुग्ण होते त्‍यापैकी ६ मयत झाले असून उपचार करून घरी परतणारे हे पाहिलेच रुग्ण असून यामुळे सावदा वासीयांमध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *