भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ ते मनमाड व भुसावळ ते नंदुरबार पैसेंजर गाडी सुरू करावी याबाबत भुसावळ मंडळ रेल प्रबंधक यांचे कडे माजी नगरसेवक दिपक काशिनाथ धांडे यांनी मागणी केली असून दिले आहे .
जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असून जळगाव मध्ये जैन कंपनी सारख्या अनेक मोठं मोठ्या कंपन्या आहे सोबतच जळगावला एमआयडीसी आहे त्यामुळे भुसावळ येथून जळगावला जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे सध्या पावसाळा सुरू झाल्याने रोज जळगाव भुसावळ अप डाऊन करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यात जळगावला जाणाऱ्या रस्त्याचे काम चालू असल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे अशात दवाखाने बंद असल्याने अपघाती वक्तीला खूपच अडचनींचा सामना करावा लागत आहे म्हणून आपल्याला या निवेदनाद्वारे विनंती करतो की सकाळी ६ वाजेला असणारी मुंबई पॅसेंजर ही कमीत कमी मनमाड पर्यंत सुरू करावी व सकाळी ८ वाजेल असणारी सुरत पॅसेंजर ही नंदुरबार पर्यंत सुरू करावी जेणे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज अप डाऊन करणाऱ्या प्रवाशाचा त्रास कमी होईल आपल्या अटी व शर्ति प्रवासी मान्य करतील .
या निवेदनाचा गांभीर्य पूर्वक विचार करून हजारो चाकरमान्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक दिपक काशिनाथ धांडे यांनी केली आहे



