भुसावळ (प्रतिनिधी )-
-येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना दि.३१ मे रोजी सायंकाळी ७-१५ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीवरून बाजारपेठ पोलीस पथकाने सापळा रचुन हद्दपार आरोपीस ताब्यात घेतले. हद्दपार आरोपी प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी(वय २७) रा.पंढरीनाथ नगर,भुसावळ हा भुसावळ शहरातील नाहाटा चौफुल्ली भागात आल्याच्या माहितीवरून तो पोलीसांच्या जाळ्यात आला.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,पोहेकाॅ.सुनिल जोशी,पोना. रमण सुरळकर,महेश चौधरी, तुषार पाटील,उमाकांत पाटील,पोका.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांनी केली.या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग ६, गुरनं. ०५७७/२०२० मुं.पो.अॅक्ट कलम-१४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.



