दुय्यम दर्जाचे कार्य बंद करावे – रेल कामगार सेनेची मागणी ; पालकमंत्री यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची रेल कामगार सेनेच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन भुसावळ रेल्वेतील लॉक डाऊन संदर्भात चर्चा करून लॉक डाऊन संपेपर्यंत इमर्जन्सी वगळता व रेल्वे बोर्डाच्यां आदेशाचे पालन करत बाकीचे दुय्यम दर्जाचे रेल्वेचे कार्य बंद करावे अशी मागणी करण्यात आली.
रेल्वे लॉक डाउन संबंधित शिवसेना नेते,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आज ११में मंगळवार रोजी भेट घेतली व भुसावळ रेल्वेतिल लॉक डाउन संदर्भात चर्चा केली
पीओएच , एमओएच , ट्रैकमैन-इंजीनियरिंग , डीसीओएस , डीआरएम कार्यलय व इतर ठिकाणी ड्यूटी सुरु आहे. त्याठिकाणी खालील प्रमाणे कर्मचारी यांची तीव्र स्वरूपाची समस्या मांडण्यात आली असून कारखाना उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी भुसावळ ऑरेंज झोन मध्ये असताना दिली होती .आणि आता भुसावळ हे रेड झोन मध्ये असून पीओएच कारखाना व एमओएच शेड हे नियंत्रण क्षेत्रा जवळच हाकेच्या अंतरावर असून तरी सुद्धा पीओएच कारखाना सुरू करण्यात येत आहे व एमओएच ,पीओएच ,
डीसीओएस , डीआरएम कार्यालय , इंजीनियरिंग व इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारी हे एकमात्र रस्त्यावरून ये-जा करणार असून वेगवेगळ्या परिसरातील कर्मचारी वर्ग असून ५० वर्षे वयोगटातील कर्मचारी यांना सुध्दा ड्युटी वर बोलवण्यात येत आहे आणि 50 वर्षे वयोगटातील कर्मचारी यांना कोरोना ची बाधा होण्याची दाट शक्यता असते कारण त्यांना या वयोगटात अनेक आजार ग्रस्त असतात. काही विभागाना रेल्वे क्षेत्रातील दुय्यम स्थानचे आहे.महाराष्ट्रातील बहुतेक रेल्वेचे कारखाने बंद आहेत. आणि जिल्ह्यासह भुसावळ ची परिस्थिती गंभीर होवु शकते म्हणून पीओएच कारखाना पूर्णत: बंद करावा तरी आणखी महत्त्व पुर्ण विषयावर चर्चा झाली आहे.आणि आमच्या विनंतीला मान देऊन रेल्वे दवाखान्याची परिस्थिती व काय उपाययोजना व काही कमतरता आहे ते पहाणी करण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे दवाखान्याला भेट द्यावी असे आम्ही सांगितले.शेवटी मा गुलाबराव पाटिल यांनी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. बऱ्याच ठिकाणी रेल्वे कामगारांना कोरोना प्रतिबन्धक वैद्यकीय सामग्री पुरेस्या प्रमाणात देण्यात येत नाही-आलेली नाही . सोशल डिस्टन्स ची पूर्ण ऐसी-तैसी झालेली आहे. एमओएच मध्ये ड्यूटी वर येताना भरपूर त्रास होतो.वेळेप्रसंगी पोलिसांचा त्रास होतो ल जे कामगार कोरोना पॉजिटिव एरियात राहतात त्यांना एमओएच मध्ये तिन शिफ्ट मध्ये ड्यूटी साठी बोलावले जात आहेत. पीओएच कारखाना ऐन-केन प्रकारे सुरू झाला तरी आम्ही चालू झाल्यावर पीओएच कारखाना बंद करण्याचे प्रयत्न नक्की करू . जोपर्यंत आपल्या भुसावल मधुन कोरोना हद्दपर होत नाही तोपर्यंत व लॉक डाउन संपे पर्यंत इमर्जन्सी वगळता व रेल्वे बोर्डाच्यां आदेशाचे पालन करत बाकीचे दुय्यम दर्जाचे रेल्वेचे कार्य बंद करावे.अशी मागणी करण्यात आली असून निवेदन दिले यावेळी -ललितकुमार मुथा-मंडळ अध्यक्ष , प्रितम टाक-मंडळ कार्याध्यक्ष ,अरविंद थोरात-मंडळ उपाध्यक्ष रेल कामगार सेना , भुसावळ विभाग उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *