माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे यांचे दातृत्व ; एक लाख रुपये किमतीचे अन्नधान्य केले वाटप

वरणगाव (प्रतिनिधी )-
वरणगाव येथील माजी नगरसेवक रविंद्र सोनवणे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवत गरीब गरजवंत कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे एक लाख रुपयाचे अन्नधान्य पुरवठा स्वखर्चातून करत नागरिकांनीही घराच्या बाहेर पडु नका अशा प्रकारचा संदेश दिला
शहरात संचारबंदी लागली असून वरणगाव शहरात बहुतांशी शेती हा व्यवसाय असल्याने येथे मजुरांची संख्या जास्त आहे रोज काम करून रोजचा चरितार्थ चालवण्याचे संख्या जास्त आहे यामुळे काम नसल्याने अनेकांना रोजचा चरितार्थ चालवण्यासाठी चुली पेटविण्यासाठी अडचणी येत होत्या यासाठी माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे यांनी स्वखर्चातून दहा क्विंटल गहू दहा 10 क्विंटल तांदूळ तीन क्विंटल साखर 300 लिटर तेल 50 किलो चहा पावडर व इतर साहित्य अंदाजे एक लाख रुपये किमतीचे तीनशे कुटुंबापर्यंत तीनशे कुटुंबांना पोचवले व यापुढे शासनस्तरावरून दिलेल्या निर्देशांचे पालन करा कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर दूरध्वनीवरून संपर्क साधा कोणीही घराच्या बाहेर पडू नका अशा प्रकारचे आवाहन करत घरपोच अन्नधान्याचे वाटप केले या उपक्रमाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे साहित्य वाटप वेळी नगरसेवक राजेद्रभाऊ चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक मराठे बाळा धनगर, गोगा सेठ, पप्पु जकादर, शेक रिजवान, धमेद्र गांगुडे, संतोष भोई, नथ्यु कोळी ऊपस्थित हाेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *