भुसावळात जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे गरीबाना अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी ) –
जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाने भुसावळमध्ये राबविला ” एक हात मदतीचा – माणसांसाठी माणसांतील माणुसकीसाठी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व त्यातच लॉकडाऊनमुळे शहरात सर्वत्र मोलमजूरीची कामे बंद असुन खानावळ तसेच दुकाने सुद्धा बंद आहेत, अशा परीस्थितीत ज्यांना रोज कष्ट करून दररोज आपल्या कुटूंबाचे पोट भरावे लागते अशा गरीब व गरजू नागरिकांची , गोर गरीब मजूरांची जेवणाची गैरसोय होत असून त्यांचेवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे , त्यामुळे गरीब व गरजू नागरीकांसाठी , मजूरांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष.ना.बाळासाहेब थोरात व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष ना.नितीन राऊत यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.विजयजी अंभोरे यांच्या सुचनेनुसार उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत 31 मार्च रोजी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाच्या मार्फत , भुसावळ येथे ” एक हात मदतीचा , एक हात माणुसकीचा ” हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील पंचशील नगर येथे गोर गरीब हात मजूरी करणार्या नागरीकांना अन्न धान्य तसेच रेल्वे स्टेशन परिसर,बस स्टँण्ड, छत्रपती शिवाजी शाँपिंग काँप्लेक्स,डाँ उन्मेश खानापूरकर लहान मुलांचे हाँस्पिटल,माता रमाबाई आंबेडकर नगर येथे जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.विवेक नरवाडे तसेच उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या हस्ते भोजन दान देण्यात आले. यावेळी मा.योगेंद्रजी पाटील,विवेक नरवाडे,सुनिल जोहरे,विनोद पवार,ईस्माइल गवळी तसेच विश्वनाथ संदांशिव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *