श्री विट्ठल मंदिर संस्थांन भुसावळच्यावतीने एक हात मदतीचा ;कोरोनाग्रस्त मदतीकरीता एक लाख अकरा हजार रुपये निधी तहसिलदार यांचेकडे सुपुर्द

भुसावळ (प्रतिनिधी )-
श्री विट्ठल मंदिर संस्थांन भुसावळच्यावतीने
एक लाख अकरा हजार रुपये निधी कोरोनाग्रस्त करीता मदत म्हणून तहसिलदार यांचेकडे सुपुर्द करण्यात आला .
जगासह संपूर्ण थैमान घातलेल्या कोविड 19 चा फैलाव आपल्या भारतात सुद्धा पसरत आहे .महाराष्ट्रात पुणे, मुंबई सह अनेक जिल्ह्यात प्रादर्भाव वाढत आहे सर्वत्र लॉक डाउन असल्याने परिस्थिती गंभीर आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला अल्पशी मदत संस्थेतर्फे देवून खारीचा वाटा म्हणून शासनाला कोरोनाग्रस्तांना मदत करण्याकरीता श्री विट्ठल मंदिर संस्थांन यांच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपये निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहायतानिधी मध्ये जमा करण्याकरीता तहसीलदार दिपक धिवरे यांच्या कडे आज सोमवार ३० मार्च रोजी सुपुर्द करण्यात आला . यावेळी आमदार संजय सावकारे , मंदिर संस्थान ट्रस्टी सुहास फालक, किरण महाजन,माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारंबे, प्रशांत ब-हाटे ,संजय पाटील,व मनोज महाजन आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी सर्व संस्थानी सुद्धा पुढाकारा घेवून मदत करावी ,असे आवाहन विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुहास फालक यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *